आधीसारखे आता
आला पावसाळा गेला पावसाळा
झाले सारे ओलेचिंब तरी आत कोरडाच मी
पूर्वीसारखे मन पावसासोबत रिते झाले नाही
गिरवतो कितीदा नव्याने पुन्हा पण आधीसारखे आता
तुझे चित्र तयार झाले नाही
आधीसारखं माझं मन आता आकार घेत नाही
किताही ठरवले तरी जीवाचे सोपस्कार होत नाही
कितीदा विनवूनी बोलावले तुला पण
आधीसारखा आता तुझा होकार येत नाही
पहिल्यासारखा चेहऱ्यास रंग येत नाही,
पापण्यासह डोळ्यात तरंग (संग )येत नाही
चिंब होऊनी पावसात फिरतो कितीदा
आधीसारखा मातीला आता गंध येत नाही
पहिल्यासारखा आता मला भास होत नाही
पहिल्यासारखा आतुर श्वास होत नाही
दिसते न दिसली कधी तु आता तरीही
पहिल्यासारखा मनाला आता त्रास होत नाही
चांदण्यात आता फिरणे होत नाही
रातराणीच्या सुगंधात हरवणे होत नाही
भिती वाटते आता अचानक वीज चमकल्यावर
खुल्या वाऱ्यात भरकटायचे आता साहस होत नाही
पहिल्यासारखी ह्दयाची धडधड होत नाही
अंतरंगात भावनांची खडबड होत नाही
अगदी सहज रिते होते धुंद मन माझे आता
पहिल्यासारखी पापण्यांची पडझड होत नाही
- संदीप सुभाषराव देसले
Comments
Post a Comment