आधीसारखे आता
आला पावसाळा गेला पावसाळा झाले सारे ओलेचिंब तरी आत कोरडाच मी पूर्वीसारखे मन पावसासोबत रिते झाले नाही गिरवतो कितीदा नव्याने पुन्हा पण आधीसारखे आता तुझे चित्र तयार झाले नाही आधीसारखं माझं मन आता आकार घेत नाही किताही ठरवले तरी जीवाचे सोपस्कार होत नाही कितीदा विनवूनी बोलावले तुला पण आधीसारखा आता तुझा होकार येत नाही पहिल्यासारखा चेहऱ्यास रंग येत नाही , पापण्यासह डोळ्यात तरंग ( संग ) येत नाही चिंब होऊनी पावसात फिरतो कितीदा आधीसारखा मातीला आता गंध येत नाही पहिल्यासारखा आता मला भास होत ...