आता तुझ्यासाठी मी फक्त
आता तुझ्यासाठी मी फक्त एक नाव बनून राहिलोय
हद्दयाच्या खुंटीवरती जुनी जपमाळ बनून राहिलोय
न ओलावतील डोळ्यांच्या कडा न उगवेल इथे काही
पापण्यांच्या पडझडीत दडलेलं एक गाव बनून राहिलोय
हद्दयाच्या खुंटीवरती जुनी जपमाळ बनून राहिलोय
न ओलावतील डोळ्यांच्या कडा न उगवेल इथे काही
पापण्यांच्या पडझडीत दडलेलं एक गाव बनून राहिलोय
सुरवंटाचे हाल जसे फुलपाखरू उडून गेल्यावर
मंदीर होईल जसे कुणी मूर्ती चोरून नेल्यावर
गीतातील माधुर्य काय ते सूर नाहीसे झाल्यावर
भाव हरवलेल्या कवितेतील फक्त शब्द बनून राहिलोय
पाऊस पडतांना आस जशी जिवाला ऊन पडण्याची
उन तापल्यावर अपेक्षा का रे रिमझीम बरसण्याची
ऊनसावल्यांच्या खेळात होते तशीच तगमग जीवाची
पाऊलांची साक्ष देणारा मैलाचा एक दगड बनून राहिलोय
ढग नाहीसे होती जैसे वारा पिंजून गेल्यावर
वाट वेगळी झाली तैसी वळलेल्या त्या वळणावर
शब्दांचा पुर आत माझ्या अन बांध ओठांच्या काठावर
पापण्यांतील सरींवर स्वप्नांची फक्त झालर बनून राहिलोय
- संदीप सुभाषराव देसले. (७ एप्रिल २०२३)
Comments
Post a Comment